-
सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्या दिवसापासून या पर्वात वाद, राडे पाहायला मिळत आहेत.
-
अशातच दुसऱ्या बाजूला हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची देखील चर्चा रंगली आहे. या पर्वाची तयारी सुरू झाली आहे.
-
दरम्यान, अतिशय वादग्रस्त असलेला हा शो ज्या मराठी कलाकारांमुळे चांगलाच गाजला, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. (Instagram)
-
राखी सावंत बिगबॉसच्या पहिल्या, ६ व्या, १४ व्या आणि १५ व्या पर्वात दिसली होती. राखी सावंतमुळे हे पर्व चांगलेच चर्चेत आले होते. (Instagram)
-
अभिनेत्री शिल्पा शिंदे बिगबॉस ११ या पर्वाची विजेती ठरली होती. हिना खान तिची विरोधी स्पर्धक होती. (Instagram)
-
बिगबॉस १२ पर्वात अभिनेत्री नेहा पेंडसेने सहभाग घेतला होता. यावेळी ती तिच्या फॅशनसेन्ससाठी खूप चर्चेत राहिली. (Instagram)
-
याच पर्वात बिगबॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. (Instagram)
-
बिगबॉस १३ हे पर्व निक्की तांबोळीमुळे चांगलेच गाजले. तर गायक राहुल वैद्य या पर्वाचा उपविजेता ठरला होता. (Instagram)
-
क्यूट आणि चुलबुली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश बिगबॉस १५ ची विजेती ठरली होती. (Instagram)
-
बिगबॉस १६ हे पर्व अभिनेता शिव ठाकरेने गाजवले. बिगबॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता राहिलेल्या शिवने हिंदी बिगबॉसमध्येही त्याच्या तल्लख बुद्धी आणि सच्चेपणाने संपूर्ण देशातील प्रेक्षकांची मनं जिंकली. (Instagram)
-
अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह बिगबॉस १७ मध्ये भाग घेतला होता. या पर्वात ते दोघेही आपापसातील मतभेदांमुळे चर्चेत राहिले. या पर्वात अंकिता टॉप ४ स्पर्धकांमध्ये होती. (Instagram)
-
बिगबॉसच्या आगामी १८व्या पर्वात कोणता मराठी स्पर्धक असणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (Instagram)

ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश