-
मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचं आगमन झालं आहे.
-
अभिज्ञा व तिचा पती मेहुल दरवर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट करतात.
-
यंदा अभिज्ञाच्या घरी बाप्पासाठी कोणता देखावा असणार याची उत्सुकता तिच्या सर्वच चाहत्यांना होती.
-
अखेर घरगुती सजावटीचे सुंदर असे फोटो शेअर करत अभिज्ञाने बाप्पाची झलक सर्वांना दाखवली आहे.
-
अभिज्ञाच्या घरी बाप्पाच्या स्वागतासाठी खास तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.
-
“वेंकटरमणा गोविंदा! यावर्षी बालाजींच्या रुपात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.” असं कॅप्शन अभिज्ञाने या फोटोंना दिलं आहे.
-
अभिज्ञा पुढे म्हणते, “या वेळचा बाप्पा आहे माझ्यासाठी खास, म्हणून केली तिरुमाला तिरुपतीची आरास…गणपती बाप्पा मोरया!”
-
अभिज्ञा व तिच्या पतीने बाप्पासाठी केलेली ही तयारी पाहून सर्वजण त्यांचं कौतुक करत आहेत.
-
मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे इन्स्टाग्राम )

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती