‘तुंबाड’ चित्रपट दुसऱ्यांदा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबाबत अनेक गोष्टींचे खुलासे झाले आहेत. सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने आपल्या मूळ कलेक्शनपासून बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली.सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला आहे आणि यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी या चित्रपटात अनेक बदल केले आहेत. ‘तुंबाड’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सोहम शाहाने नुकतेच आपल्या फेसबूक अकाऊंटवर चित्रपटासंबंधीत काही फोटो शेअर केले आहेत. चित्रपटात म्हाताऱ्या आजीची भूमिका ही मोहम्मद समद या बाल कलाकारने साकारली होती. अभिनेता सोहम शाहाने फेसबूकवर शापित म्हाताऱ्या आजीचीचे काही वेगळे फोटो शेअर केले आहेत. चित्रपटात शापित म्हाताऱ्या आजीचीचे रूप अगदी भीतीदायक होते, या रूपाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की ‘तुंबाड’ मधील शापित म्हाताऱ्या आजीचे लूक फायनल करण्यापूर्वी निर्मात्यांनी आजीच्या भूमिकेसाठी या रुपाचे पर्याय ठेवले होते”. चित्रपटाची कथा ही ‘हस्तर’ या पात्रामुळे आणखी गाजली, चित्रपटात ‘हस्तर’चे रूप अगदी वेगळे होते. सोहम शाहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ‘हस्तर’चे ही वेगळे रूप पाहायला मिळत आहे. अभिनेत्याने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता की चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीचे पात्रांचे रूप वेगळे होते आणि एडिटिंगच्या मदतीने ते खरे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती भेटली आहे, सध्या चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत आहे. (फोटो: सोहम शाहा अधिकृत फेसबूक अकाऊंट)