-
रुबिना दलिक ‘छोटी बहू’ या हिंदी मालिकेतून घराघरांत पोहोचली.
-
त्यानंतर ‘जीनी ऑर जुजू’ , ‘पुनर्विवाह’ यांसारख्या अनेक मालिकांमधून प्रसिद्धी मिळवली.
-
त्यानंतर ती बिग बॉसची विजेती झाल्यामुळे तिची सिनेमा इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच ओळख तयार झाली.
-
रुबिनाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून, ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
रुबिनाने गुलाबी साडीवर फोटोशूट करीत खास लूक सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये रुबिनाने गुलाबी रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर हिरव्या रंगाचे मोठे कानातले आणि हातात हिरव्या रंगाची अंगठी घातली आहे ज्याने तिच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.
-
रुबिनाच्या या फोटोशूटमधील प्रत्येक फोटोमध्ये ‘बोल्ड’ अंदाज दिसून येतो.
-
रुबिनाच्या या लूकचे चाहत्यांनी भरपूर कौतुक केले आहे.
(सर्व फोटो सौजन्य ; रुबिना दलिक / इंस्टाग्राम)