-
सुप्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवानीने सोशल मीडियावर टीरा ब्यूटी इव्हेंटचा हा खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
‘टीरा ब्युटी’ हा ईशा अंबानींचा स्टार्टअप ब्युटी ब्रॅण्ड असून, नुकताच जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ‘टीरा ब्युटीचा’ स्टोअर लाँच इव्हेंट झाला.
-
या इव्हेंटसाठी करीना कपूर, कियारा अडवानी, सुहाना खान यांसारख्या अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांना आमंत्रण होते.
-
या लूकसाठी कियाराने लाल रंगाचा डिझायनर कोट आणि शॉर्ट पँट परिधान केली आहे.
-
लाल कोटवर असलेल्या हाताकडच्या फुलांच्या डिझाइनने लक्ष वेधून घेतले आहे.
-
या ड्रेसवर परिधान केलेल्या सोनेरी कानातले व अंगठीमुळे कियाराच्या लूकला एक वेगळेच तेज आले आहे.
-
या फोटोमध्ये कियारा तिच्या आऊटफिटला मॅच होणाऱ्या बॉटलमधून स्ट्रॉने काही पीत असताना पोज दिली आहे.
-
कियाराने या फोटोशूटमध्ये काही एस्थेटिक फोटोही काढले आहेत.
-
या फोटोमध्ये कियाराने आरशामध्ये ओठांवर हात ठेवत अनोखी पोज दिली आहे.
-
तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले असून, कमेंट सेक्शन प्रशंसेने भरून गेला आहे.
(सर्व फोटो सौजन्य ; किनारा अडवानी, टीरा ब्युटी / इंस्टाग्राम)