-
सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल ‘सनी लिओनीने’ पारंपरिक लूकमध्ये काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सुरुवातीला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करून प्रसिद्धीझोतात आलेली सनी लिओनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत अधिक प्रसिद्ध झाली.
-
‘रागिणी एमएमएस २’ , ‘तेरा इंतजार’ यांसारख्या चित्रपटांतून सनी लिओनी लोकप्रिय झाली.
-
बिग बॉसमध्ये सनीने लोकांचं मन जिंकलं आणि अधिक लोकप्रिय झाली.
-
“स्प्लिट्सविला” या ‘एमटीव्ही’वरील कार्यक्रमाध्ये सूत्रसंचालन करत सनीने लोकांच्या मनात घर केले.
-
या फोटोमध्ये सनीने क्रिम रंगाचा पारंपरिक कुर्ता आणि लेहेंगा परिधान केला आहे.
-
सनीच्या या ड्रेसवर सोनेरी रंगाची एम्ब्रॉयडरी असल्यामुळे या आउटफिटला एक अनोखा लूक आला आहे.
-
सनीने या लूकसाठी सोनेरी रंगाचे मोठे कानातले आणि हातात हिऱ्याच्या अंगठ्या घातल्या आहेत.
-
ड्रेसवर परिधान केलेल्या या ओढणीला सोनेरी किनारने सजावल्यामुळे या ड्रेसची सुंदरता खुलून आली आहे. सनीच्या या अदाकारीवर चाहते फिदा झाले आहेत आणि कमेंट सेक्शन भरून टाकला आहे.
(सर्व फोटो सौजन्य ; सानी लिओनी)