-
बॉलीवूड कलाकारांचे प्रेम, लग्न हे नेहमी चर्चेत असतात. २०२४ हे वर्ष सरत आले आहे. यावर्षी काही सेलिब्रिटींना त्यांच्या पार्टनरपासून विभक्त व्हावे लागले आहे.
-
२०२५ हे वर्ष तोंडावर आहे. काहीच दिवसांनी नव्या वर्षाला सुरुवात होईल. त्याआधी आपण २०२४ मध्ये वेगळ्या झालेल्या सेलिब्रिटींच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊयात.
-
सुपरस्टार धनुष
धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी घटस्फोट घेतला आहे. १८ नोव्हेंबर २००४ रोजी त्यांनी विवाह केला होता. -
ए आर रेहमान
ए आर रेहमान आणि सायरा बानो यांनीही नुकताच त्यांचा घटस्फोट जाहीर केला आहे. लग्नानंतर २९ वर्षांनी ते वेगळे झाले आहेत. -
हार्दिक पांड्या
अभिनेत्री नताशा स्तांकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांचाही यंदा घटस्फोट झाला आहे. हे कपल खूप चर्चेत होते. -
ईशा देओल
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल आणि तिचा नवरा भरत तख्तनी या जोडप्याचाही यंदा घटस्फोट झाला आहे. या दोघांनी २०१२ मध्ये विवाह केला होता. -
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरादेखील यंदा वेगळे झाले आहेत. त्यांचे ब्रेकअप झाले आहे. ते २०१९ पासून एकत्र राहायचे. -
उर्मिला मातोंडकर
लग्नानंतर ८ वर्षांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिचा नवरा मोहसीन अख्तर मीर याच्यापासून विभक्त होण्यासाठी घटस्फोट प्रक्रिया सुरू केली आहे. २०१६ मध्ये उर्मिलाने लग्न केले होते. -
ईशा कोप्पिकर
लग्नाच्या १० वर्षांनी ईशा आणि टीम्मी नारंग वेगळे झाले होते. त्यांच्या घटस्फोटामगील कारण मात्र समजू शकले नाही. (सर्व फोटो- लोकसत्ता संग्रहित)

Ahmedabad Plane Crash : मोठी बातमी : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ करताच अपघात