-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं आहे.
-
विदेशातील दौरे झाल्यानंतर २ डिसेंबरपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. त्यामुळे सध्या या कार्यक्रमातील कलाकार चर्चेत आले आहेत.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
तसंच हास्यजत्रा कार्यक्रमामुळे बऱ्याच नवोदित कलाकारांना नवी ओळख मिळाली असून ते रुपेरी पडद्यावर देखील पाहायला मिळत आहेत. त्यापैकी एक म्हणजे शिवाली परब.
-
अभिनेत्री शिवाली परबने नुकताच तिच्या क्रशचा खुलासा केला आहे. हा क्रश ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’मधील अभिनेता आहे.
-
अलीकडेच शिवालीने हास्यजत्रेमधील कलाकारांबरोबर ‘प्लॅनेट मराठी’ या एंटरटेनमेंट न्यूज चॅनेलशी संवाद साधला. यावेळी शिवाली परबला उपस्थितीत असलेल्या कलाकारांची कार्टुनबरोबर तुलना करायला सांगितलं. तेव्हा तिने क्रशचा खुलासा केला.
-
शिवाली म्हणाली, “सावत्या म्हणजे माझ्यासाठी शिजुका आहे. कारण मी कॉलेजमध्ये असताना तो नाटक वगैरे करायचा. मी त्याला बघायला जायचे. तो माझा क्रश होता.”
-
पुढे शिवाली म्हणाली की, रोहितचं एक नाटक मी आठ ते नऊ वेळा मुंबईत बघितलंय. इतकं मी त्याला बघायला जायची. नोबितासाठी शिजुका कशी आहे, तसं माझ्यासाठी सावत्या आहे.
-
शिवाली परबचं हेच बोलणं ऐकून एकच हशा पिकला. तेव्हा मजेत रोहित माने म्हणाला की, “मला दुसरं लग्न करावं लागतंय.”
-
दरम्यान, शिवाली परबचा कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिचं नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवाली नाट्य क्षेत्रात पदार्पण करत आहे. या नाटकात शिवालीसह प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळणार आहे. २१ डिसेंबरपासून हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.
-
तसंच शिवालीचा ‘मंगला’ नावाचा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
( फोटो सौजन्य – शिवाली परब इन्स्टाग्राम )

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या