-
अभिनय व उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मानसी नाईकने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तिच्या विविध लूकसाठी चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करत असल्यामुळे चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी मानसीने जांभळ्या रंगाची पैठणी नेसली आहे.
-
या साडीला सोनेरी रंगाची किनार आहे आणि त्यावर मोर व फुलांची डिझाइन आहे.
-
या साडीवर मानसीने सोन्याचा भरजरी चोकर आणि मोठे गोलाकार कानातले परिधान केल्यामुळे मानसीचे सौंदर्य खुलून आले आहे.
-
माथ्यावर परिधान केलेल्या बिंदीमुळे मानसीच्या लूकला एक वेगळेच सौंदर्य लाभले आहे.
-
चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ते मानसीच्या हातातील अनोख्या बांगड्यांनी.
-
मानसीने दोन्ही हातांत कडे घातले आहे.
-
मानसीने केसांना साडीच्या ब्रोचने सजविले आहे.
-
सोशल मीडियावरील पोस्टला मानसीने ‘जोडलेलं जपायला जमलं, त्यांना जगणं जमलं’ अशी अनोखी कॅप्शन दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : मानसी नाईक / इंस्टाग्राम)