-
‘बिग बॉसच्या १८’व्या पर्वातील ३१ डिसेंबरच्या भागात ज्योतिषी प्रदीप किराडू आले होते. यावेळी त्यांनी घरातील सदस्यांना हटके नावं देत, भविष्यवाणी सांगितली.
-
ज्योतिषी प्रदीप किराडू करणवीर मेहराला काय म्हणाले? त्यांनी काय सल्ला दिला? जाणून घ्या…
-
ज्योतिषी प्रदीप किराडू यांनी करणवीर मेहराला ‘चाणक्य’ नाव दिले.
-
करणवीरबाबत सांगत प्रदीप किराडू म्हणाले, “हा खूप हुशार माणूस आहे. तो डोकं इतकं लावतो की कोणीही समजू शकत नाही. कोणाला बघेल आणि कोणाला मारले हे समजणार पण नाही. जर याची सटकली ना, तर इतकं प्रेमाने मारेल की समोरच्याला कळणार पण नाही.”
-
त्यानंतर ज्योतिषींनी करणला लग्न न करण्याचा सल्ला दिला.
-
ज्योतिषी करणला म्हणाले, “लग्न करू नकोस. करशील आणि फसशील. तुझ्यापासून कोणतीही मुलगी आनंदी राहू शकत नाही.”
-
“जर कोणत्या मुलीला करण आवडत असेल तर आताच डोक्यातून काढून टाका. याला दूर ठेवा. अशा कुंडलीमध्ये मुलगी येऊ शकत नाही जरी आली तरी निघून जाईल आणि अशा प्रकारे निघून जाईल की आयुष्यात पुन्हा चेहरादेखील पाहणार नाही,” असं स्पष्ट ज्योतिषींनी करणला सांगितलं.
-
पुढे अभिनय क्षेत्रापेक्षा राजकारणात जास्त यश मिळेल, असं ज्योतिषींनी करणला सांगितलं.
-
ज्योतिषी म्हणाले, “येणाऱ्या काळात तू चांगला राजकारणी बनू शकतोस.” ( सर्व फोटो सौजन्य – करणवीर मेहरा इन्स्टाग्राम )

IND vs PAK: सूर्यादादाचा षटकार अन् भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, कर्णधाराने चाहत्यांना दिलं विजयाचं गिफ्ट