-
छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्री ऋतुजा लिमयेचा विवाहसोहळा डिसेंबर महिन्यात थाटामाटात पार पडला.
-
लग्नातील सुंदर फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
-
ऋतुजाने लग्नात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
लाल रंगाचा भरजरी लेहेंगा, सुंदर दागिने या ट्रेडिशनल लूकमध्ये ऋतुजा फारच सुंदर दिसत होती.
-
ऋतुजाचा नवरा हृषिकेश पाटील सुद्धा अभिनेता व निर्माता म्हणून ओळखला जातो.
-
अभिनेत्रीने साखरपुडा झाल्यावर, ते दोघंही गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट केलं होतं.
-
आता ऋतुजा आणि हृषिकेश लग्नबंधनात अडकले असून त्यांनी आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
-
अभिनेत्री आजवर ‘नवे लक्ष्य’, ‘जय देवा श्रीगणेशा’ या ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली आहे.
-
याशिवाय, भरत जाधव यांच्याबरोबर ‘सही रे सही’ या नाटकात देखील तिने काम केलेलं आहे. (सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा लिमये इन्स्टाग्राम )

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या