-
पुष्पा 2 रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत चार आठवड्यात जगभरात १७९९ कोटींची कमाई केली आहे. आता प्रेक्षक ओटीटीवर या ॲक्शन थ्रिलरच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी निर्मात्यांनी पुष्टी केली होती की हा चित्रपट किमान ५६ दिवस OTT वर उपलब्ध होणार नाही. त्याच वेळी बातमी येत आहे की जानेवारी 2025 च्या अखेरीस नेटफ्लिक्सवर प्रीमियर होऊ शकतो.
-
रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 2 हा सिनेमा 30 जानेवारी रोजी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix वर सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये – हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळममध्ये रिलीज होईल. मात्र, चाहत्यांना याबाबत अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.
-
यापूर्वी असे वृत्त होते की पुष्पा 2 हा सिनेमा 9 जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होईल. त्यानंतर निर्मात्यांनी अफवा फेटाळल्या आणि घोषणा केली की अल्लू अर्जुन स्टारर रिलीजच्या 56 दिवस आधी OTT ला वर येणार नाही.
-
30 जानेवारी रोजी रिलीज होऊन 56 दिवस पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत आता ३० जानेवारीला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
-
दरम्यान, कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, ‘पुष्पा 2’ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 1193.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी हिंदी भाषेतही या चित्रपटाने 800 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
-
सुकुमार दिग्दर्शित, पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्यासह जगपती बाबू, धनंजय, राव रमेश, सुनील आणि अनसूया भारद्वाज हे कलाकार आहेत.

Tv Actress Son : मुंबईत टीव्ही अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाने आयुष्य संपवलं, ट्युशनला जायला सांगितल्याने इमारतीवरुन मारली उडी