-
मीरा जगन्नाथने नुकताच ‘नवशक्ती’बरोबर संवाद साधला. यावेळी प्रेमात केलेला सर्वात मोठा वेडेपणा कोणता? असा प्रश्न तिला विचारण्यात आला.
-
यावर बोलताना मीराने म्हटले की, माझा जो बॉयफ्रेंड होता, त्याला लग्न करणं जमत नव्हतं. तर मी त्याला म्हटलं की ठीक आहे, मी आयुष्यात पुढे जाते. त्यानंतर माझं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न ठरलं.
-
आधी साखरपुडा होता आणि एका आठवड्यानंतर लग्न होतं. त्यावेळी माझा बॉयफ्रेंड परत माझ्या आयुष्यात आला.
-
मला विमानतळावरचे फोटो पाठवले व मला म्हटला की, मी आलो आहे तू लग्न करू नकोस. त्याने तसे म्हटल्यानंतर मी साखरपुडा मोडला.
-
बाबा चिडले वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मी पुन्हा मुंबईत आले, तर तो मुलगा परत गायब झाला. गायब म्हणजे दोन-तीन महिने बोलला आणि पुन्हा तो नाही म्हणाला.
-
माझी आई परत नाही म्हणतेय असे त्याने मला सांगितले. असे म्हणत बॉयफ्रेंडसाठी साखरपुडा मोडला होता, असे मीराने सांगितले आहे.
-
अभिनेत्री मीरा जगन्नाथ अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमुळेही अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.
-
दरम्यान, मीरा जगन्नाथ लवकरच ‘इलू इलू 1998’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
या चित्रपटातील तिची भूमिका नेमकी कशी असणार, तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(सर्व फोटो सौजन्य: मीरा जगन्नाथ इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL