-
सध्या अभिनयासह निर्मितीची धुरा उत्कृष्टरित्या सांभाळणाऱ्या शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला आहे.
-
शर्मिष्ठा आई झाली असून तिनं गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
-
रविवारी २० मार्चला शर्मिष्ठाच्या लाडक्या लेकीचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
शर्मिष्ठाच्या मुलीच्या बारशाला अनेक कलाकार मंडळींनी खास हजेरी लावली होती.
-
बारशामध्ये शर्मिष्ठाच्या मुलीच्या नावाचा खुलासा कुटुंबातील सदस्यांनी अनोख्या पद्धतीनं केला.
-
कुटुंबातील प्रत्येक सदस्य नावाचं इंग्रजी अक्षर आणून एका बोर्डवर लावताना दिसले. त्यानंतर शर्मिष्ठाच्या मुलीचं नाव सगळ्यांसमोर आलं. ‘रुंजी’ असं गोड नाव शर्मिष्ठा व तेजसच्या मुलीचं ठेवण्यात आलं आहे.
-
अभिनेत्रीनं ‘रुंजी’च्या नावामागचा अर्थ स्पष्ट केला. शर्मिष्ठा म्हणाली, “‘रुंजी’ नाव आहे, म्हणजे अकस्मात सुंदर.”
-
पुढे शर्मिष्ठा राऊत म्हणाली की, ‘रुंजी’ नावाचा दुसरा अर्थ असा आहे की, मनात रुंजी घालणं म्हणजे मनात सतत घोळत राहणं. एकदा का रुंजीला बघितलं, तिच्याशी बोललं, तर ती कोणाच्या मनातून उतरणार नाही. सतत घोळत राहिलं.
-
दरम्यान, शर्मिष्ठा राऊतचं लग्न लॉकडाऊनदम्यान ऑक्टोबर २०२०मध्ये झालं होतं. तिनं तेजस देसाईबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर शर्मिष्ठा व तेजस आई-बाबा झाले आहेत.

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…