-
शाहरुख खानने ५९ व्या वर्षी ‘Met Gala 2025’ मध्ये पदार्पण केलं आहे.
-
किंग खानच्या ‘मेट गाला’मधील रॉयल लूकची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. यंदा शाहरुखचा लूक प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केला होता.
-
शाहरुखने रेड कार्पेटवर एन्ट्री घेताना काळ्या रंगाचा फ्लोअर लेंग्थ कोट घातला होता.
-
रेड कार्पेटवर एन्ट्री घेताना फ्लोअर लेंग्थ कोट, सिल्क शर्ट आणि काळ्या रंगाची ट्राउझर या लूकमध्ये शाहरुख एकदम रुबाबदार दिसत होता.
-
शाहरुखने हा लूक परिपूर्ण करण्यासाठी हातात वॉकिंग स्टिक घेतल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. या स्टिकवर तब्बल १८ कॅरेट सोन्याचा बंगाली टायगर हेड केन लावण्यात आला होता. असं डिझायनर सब्यसाचीने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
-
याशिवाय रेड कार्पेटवर एन्ट्री घेताना किंग खानने गळ्यात हटके ज्वेलरी परिधान केली होती.
-
यामध्ये किंग खानचा ‘K’ आणि SRK नावाच्या पेडंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
शाहरुखने हातात डिझायनर अंगठ्या घातल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, सध्या शाहरुख खानच्या या जबरदस्त लूकचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : sabyasachi official इन्स्टाग्राम )

याला म्हणतात ठसका! हळदीत नंदेसमोर वहिणीनं केला जबरदस्त डान्स; VIDEO ची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा