-
तारक मेहता का उल्टा चष्मा ही लोकप्रिय मालिका सोनी सब टीव्हीवर तब्बल १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हलक्याफुलक्या विनोदांनी सजलेली ही मालिका अजूनही तितकीच आवडते. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
या मालिकेतील पात्रं आणि त्यांच्या गमतीजमती प्रेक्षकांच्या खूप जवळच्या झाल्या आहेत. दर वेळी नवे कथानक आणि भन्नाट प्रसंग यामुळे शो कायम नवा वाटतो. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
नवीन भागात गोकुळधामचे लोक एका पिकनिकसाठी भुताच्या बंगल्यात जातात. तिथे त्यांच्या गमतीसोबत थोडी भीतीही मिसळते आणि त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये चकोरी या भुताच्या भूमिकेत स्वाती शर्मा झळकली आहे. तिचा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला आहे की, ती चर्चेचा विषय ठरली आहे. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
स्वाती शर्मा केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही, तर ती खूप ग्लॅमरसही आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
‘तारक मेहता…’पूर्वी स्वातीने २०२३ मध्ये प्राइम व्हिडीओवरील ‘यारण दियां पौ बारा’ या चित्रपटातही काम केले होते, ज्यातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. (फोटो : the_swati_sharma)
-
स्वाती शर्मा सध्या ‘शैतानी रस्मे’ या शोमध्ये सहायक भूमिकेत काम करत आहे. ‘तारक मेहता…’मधून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तिला आणखी मोठ्या संधी मिळतील, अशी चाहत्यांना आशा आहे. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
स्वाती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ४३ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमी नवे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांशी जोडलेली असते. (छायाचित्र: the_swati_sharma)

“तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपा आमदार लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “तुझ्या मायचा…”