-
‘पंचायत’ हे वेब सिरिज गेल्या काही दिवसांपासून तिच्या चौथ्या सीझनमुळे चर्चेत आहे, या वेब सिरीजला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. नुकतेच ‘पंचायत’च्या कलाकारांनी एका हटके शैलीत फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ते एका पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहेत. (Photo: Sanvikaa Instagram)
-
पंचायत ४ मधील सचीवजी आणि रिंकी हे त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहेत. लोकांना त्यांचे रोमँटिक फोटो देखील खूप आवडत आहेत. या फोटोंमध्ये दोघांनाही एकत्र पाहून प्रेक्षक आनंद व्यक्त करत आहेत. (Photo: Sanvikaa Instagram)
-
सचिवजी आणि रिंकी यांच्या शिवाय नीना गुप्तांचा लूक देखील लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. (Photo: Sanvikaa Instagram)
-
अभिनेता जितेंद्र कुमार या फोटोंमध्ये खूपच स्टायलीश दिसत आहे. वेब सिरीजमध्ये जितेंद्र याचे पात्र हे एकाच प्रकारच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळते. या नव्या लुकमध्ये तो हटके दिसत आहे. (Photo: Sanvikaa Instagram)
-
या वेब सिरीजमधी आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे रिंकी, सान्विकाने गावातील एक सरळ साध्या मुलीचं पात्र चांगलंच वठवलं आहे. या फोटोमध्ये ती देखील वेब सिरीजमधील लुकपेक्षा वेगळ्याच अवतारत पाहायला मिळत आहे. (Photo: Sanvikaa Instagram)
-
सिरीजमध्ये अत्यंत साध्या रुपात राहणारा चंदन रॉय उर्फ विकास या फोटोंमध्ये स्टायलिश दिसत आहे. तो या फोटोशूटमध्ये खाली बसून पोज देताना दिसत आहे. (Photo: Sanvikaa Instagram)
-
‘पंचायत’मध्ये क्रांती देवीची भूमिका साकारणाऱ्या सुनीता राजवार पडद्यावर अत्यंत साध्या लूकमध्ये दिसत असल्या तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्या खूपच स्टायलिश आहेत. (Photo: Sanvikaa Instagram)
-
पंचायत सिरीजमधी बनराकस म्हणजेत अभिनेता दुर्गेश कुमार यांचा प्रवास देखील संघर्षांनी भरलेला राहिला आहे, त्यांना भूषण यापात्रातून प्रचंड नाव आणि प्रसिद्धी मिळाली आहे. (Photo: Sanvikaa Instagram)
-
‘पंचायत ४’ मध्ये बिनोदची भूमिका साकारणारा अशोक पाठक या फोटोंमध्ये खूपच वेगळा दिसत आहे. अशोकचा जन्म हरियाणातील फरीदाबाद येथील आहे. (Photo: Sanvikaa Instagram)

Daily Horoscope: अनुराधा नक्षत्रात चमकणार तुमचं भाग्य! कोणाच्या प्रेमाला नवी दिशा तर कोणाच्या हाती येतील नवीन जबाबदार्या