-
जुई गडकरी ही कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये झळकत आहे.
-
‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई सायली ही भूमिका साकारत असून तिची भूमिका प्रेक्षकांच्या आवडीची आहे.
-
अशा या लोकप्रिय अभिनेत्रीने आज तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला आहे.
-
जुई गडकरीच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर चाहत्यांचा आणि कलाकारांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
-
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी जुई सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.
-
अशातच जुईने वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे आणि सर्वांना धन्यवाद असं म्हटलं आहे.
-
जुईने निळ्या रंगाच्या साडीमधील खास फोटो शेअर केले असून या फोटोंमध्ये तिचा मोहक अंदाज पाहायला मिळत आहे.
-
जुईने हे फोटो शेअर करत ‘३८ व्या वर्षांत पदार्पण केलं असून सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद’ असं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान जुईने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

“मला विष देत असतील तर…” आमदार संजय गायकवाडांकडून मारहाणीचं समर्थन; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…