-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच ‘लपंडाव’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून या मालिकेची सर्वत्र प्रचंड चर्चा रंगली होती. यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत कोण झळकणार याबद्दलही सोशल मीडियावर उत्सुकता निर्माण झाली होती. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे.
-
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय खलनायिका संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. प्रेक्षकांची लाडकी ‘संजना’ आता नव्या मालिकेत ‘सरकार’ म्हणून ओळखली जाईल.
-
तसेच ‘लपंडाव’ या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेता चेतन वडनेरे प्रमुख भूमिका साकारणार आहे. यापूर्वी तो ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत झळकला होता.
-
रुपाली व चेतन यांच्यासह ‘लपंडाव’ या मालिकेत अभिनेत्री कृतिका देव प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
कृतिका देवने यापूर्वी सर्वत्र प्रचंड गाजलेल्या ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये काम केलं होतं. याशिवाय ‘बकेट लिस्ट’, ‘हवाईजादा’, ‘प्राइम टाइम’ अशा बऱ्याच सिनेमांमध्ये ती झळकली आहे.
-
कृतिका देव ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी आहे.
-
तर, लोकप्रिय अभिनेत्री अमृता देशमुख ही कृतिकाची नणंद आहे. कृतिका, अभिषेक आणि अमृता यांचे फॅमिली फोटो सर्वत्र प्रचंड व्हायरल होत असतात.
-
‘लपंडाव’ या ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत कृतिका ‘सखी’ ही भूमिका साकारणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : कृतिका देव इन्स्टाग्राम व स्टार प्रवाह वाहिनी )

Daily Horoscope: संकष्टी चतुर्थीला लाडका बाप्पा कोणत्या राशीवर होणार प्रसन्न? चांदण्यासम खुलतील नाती तर हातातील कामाला मिळेल यश; वाचा तुमचे राशिभविष्य