-
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने नाव कमावलेल्या एका अभिनेत्रीने बॉलिवूडला राम राम केला आणि हॉलिवूडमध्ये बस्तान बसवलं.
-
आम्ही तुम्हाला सांगतोय ते सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राबाबत. प्रियांका चोप्राने बॉलिवूड सोडलं असलं तरीही हॉलिवूडमध्ये तिने नाव कमावलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्राम पेज)
-
निक जोनास या गायकाशी लग्न झाल्यानंतर तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र तिने कशाचीही पर्वा केली नाही. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्याही पिकवल्या गेल्या. मात्र प्रियांका यशाचं शिखर हॉलिवूडमध्ये गाठत राहिली.
-
आजच्या घडीला प्रियांका चोप्रा ही अशी अभिनेत्री आहे जिचा थाट अँजेलिना जोली पेक्षाकमी नाही. तिने बॉलिवूड सोडलं त्याचंही कारण आहे.
-
देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्राने २००० मध्ये मिस वर्ल्ड हा किताब जिंकला आहे. तिने अंदाज, डॉन, फॅशन, सात खून माफ, मुझसे शादी करोगी, बाजीराव मस्तानी, कमीने असे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत.
-
फॅशन या चित्रपटातली तिची भूमिका माईलस्टोन ठरली. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण यशाच्या शिखरावर असताना तिने बॉलिवूड सोडलं
-
आपण बॉलिवूड का सोडलं त्याबाबत प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत खुलासा केला होता. मी बॉलिवूडमधल्या राजकारणाला कंटाळले होते. त्यामुळे हॉलिवूडला जायचा निर्णय घेतला.
-
सलमान खानच्या भारत या चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होती. मात्र चित्रपटाचं शूटिंग सुरु होण्याच्या दहा दिवस आधी तिने चित्रपट सोडला. यावरुन तिचं आणि सलमान खानचं भांडणही झालं. ज्यानंतर तिला साईड ट्रॅक करण्यास सुरुवात झाली. या सगळ्याला कंटाळूनच तिने बॉलिवूड सोडलं.
-
‘सात खून माफ’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत होती, तेव्हा देसी हिट्सच्या अंजली आचार्यनं तिला एका म्युझिक व्हिडीओमध्ये पाहून फोन केला आणि अमेरिकेत म्युझिक करिअर करायला सुचवलं, त्यानंतर प्रियांकानं ही संधी हेरली आणि मनाशी पक्क केलं लगेचच अमेरिकेला गेली. तिकडे तिने गायनात करिअरचा प्रयत्न केला. पण बात कुछ जमी नहीं. मग ती हॉलिवूडपटांकडे वळली.
-
प्रियांकाला क्वांटिको हा शो मिळाला आणि तिचं आयुष्य बदलून गेलं. यानंतर तिने एकाहून एक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं.
-
प्रियांका चोप्राने बेवॉच, सिटाडेल, व्हाईट टायगर अशा मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. लव्ह अगेन, अॅन एम्परर ज्वेल, हेड्स ऑफ स्टेट यामध्येही तिने काम केलं. त्यामुळे तिचं नाव आता हॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

ब्राह्मण मुख्यमंत्री आणि स्वतः मंत्री असतानाही गडकरी असे का म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही…”