-
‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
-
नवीन गाडी घेणारी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे केतकी कुलकर्णी. मराठीसह हिंदी कलाविश्वात आजवर तिने बरंच काम केलेलं आहे. याशिवाय केतकी बॉलीवूड चित्रपटात देखील झळकली आहे.
-
विशेष म्हणजे ही अभिनेत्री अवघ्या २० वर्षांची आहे. तिचा वाढदिवस २२ जुलैला असतो.
-
यंदा वाढदिवस साजरा करण्याआधीच केतकीने स्वत:ला नव्या गाडीच्या रुपात ‘सेल्फ गिप्ट’ दिल्याचं पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
-
केतकीने २० व्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून स्वकष्टाने आलिशान गाडी खरेदी केली आहे. यावेळी तिचे आई-बाबाही उपस्थित होते.
-
“ही नवीन गाडी म्हणजे माझ्या २० व्या वाढदिवसाचं अॅडव्हान्स गिफ्ट आहे. ही माझी पहिली गाडी आहे…महत्त्वाचं म्हणजे ही कार मला कोणीही गिफ्ट दिलेली नाही. मी स्वत: संयम बाळगून, नियोजन व मेहनत करून आणि स्वत:वर विश्वास ठेवून ही गाडी घेतलीये. आई-बाबा, दादा, आजी तुम्ही सगळ्यांनी मला कायम पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार…” असं केतकीने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.
-
केतकीने Maruti Suzuki XL6 ही गाडी खरेदी केली आहे.
-
केतकी कुलकर्णी सध्या ‘झी मराठी’च्या ‘कमळी’ मालिकेत झळकत आहे. ( फोटो सौजन्य : झी मराठी इन्स्टाग्राम )
-
‘कमळी’ या मालिकेत केतकी कुलकर्णी अनिका ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : केतकी कुलकर्णी इन्स्टाग्राम )

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल