-
अभिनेत्री आणि उद्योजिका पारुल गुलाटी यांनी ‘युवा पॉडकास्ट’च्या अलीकडच्या भागात नातेसंबंधांच्या बदलत्या स्वरूपावर आणि आजच्या काळातील तरुण पुरुष त्यांना अधिक आकर्षक का वाटतात, यावर स्पष्टपणे आपली मते मांडली आहेत.
-
पारुल गुलाटी म्हणाली की, तरुण पुरुष प्रेमामध्ये प्रेयसीला समजून घेण्यास तयार असतात, त्यामुळे नात्यांमध्ये यशाची शक्यता अधिक असते. मोठ्या वयाचे पुरुष मात्र अनेकदा आपला हट्ट सोडायला तयार नसतात आणि हेच अडथळा ठरतं.
-
प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ यांचं उदाहरण पाहिलं की वाटतं, अजूनही शक्यता आहेत. त्यांनी लहान वयाच्या पुरुषांशी संसार थाटला. मोठे लोक बदलायला तयार नसतात, पण कदाचित आमचं वय अजून शिकण्याचं आहे,” असं पारुल गुलाटी हसत म्हणाली.
-
३० वर्षांखालील मुलांना शिकवता येतं असं पारुल गुलाटीने विनोदी अंदाजात सांगितलं. ती पुढे म्हणाली की, थोडा संयम ठेवला आणि एकमेकांचं ऐकून घेतलं तर नातेसंबंध नीट जुळू शकतात. तरुण मुलांशी सवांद साधणं नक्कीच सोपं वाटतं. ते ऐकतात आणि जेव्हा कोणी ऐकतं, तेव्हा काहीतरी सकारात्मक घडू शकतं, असं त्या म्हणाल्या.
-
पारुल गुलाटी यांनी आधुनिक नातेसंबंध का टिकत नाहीत यावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, लग्न यशस्वी न होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे – महिलांना वाटतं की पुरुष बदलतील, तर पुरुषांना वाटतं की महिला त्यांना कधीच सोडून जाणार नाहीत.
-
अपेक्षांमधील मूलभूत विसंगती, संवादांचा अभाव आणि स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची अनिच्छा, हेच बहुतांश नातेसंबंधातील प्रमुख अडथळे ठरतात. मात्र, पारुल गुलाटी यांचा विश्वास आहे की आजचे तरुण पुरुष भावनिकदृष्ट्या अधिक जागरूक होत आहेत आणि त्यामुळे अजूनही आशेची किरण आहेत.

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…