-
दिग्दर्शक मोहित सुरी (Mohit suri) त्याच्या खऱ्या आयुष्यातही त्याच्या चित्रपटांसारखाच रोमँटिक (Romantic) आहे. (Photo: Uditaa Goswami/Instagram)
-
त्याने अभिनेत्री उदिता गोस्वामीशी (Udita Goswami) लग्न केले आहे आणि त्यांची प्रेमकथाही तितकीच खास आहे. (Photo: Uditaa Goswami/Instagram)
-
उदिता आणि मोहितची प्रेमकथा (Love Story) एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. दिग्दर्शकाने स्वतः त्यांच्या प्रेमकथेबद्दल सांगितले आहे. (Photo: Uditaa Goswami/Instagram)
-
त्याने सांगितले की त्याला पहिल्याच नजरेत उदिता आवडली होती. त्याने पहिल्यांदा तिला होर्डिंगवर (Poster) पाहिले होते. (Photo: Uditaa Goswami/Instagram)
-
त्यावेळी मोहितने मनात उदिताशी लग्न (Marriage) करायचं हा निर्णय घेतला होता. त्याने ज्यूस सेंटरच्या बाहेर बसलेला असताना उदिताच्या पहिला चित्रपट ‘पाप’ (Paap, Movie) चे पोस्टर पाहिले होते. (Photo: Uditaa Goswami/Instagram)
-
यावर पूजा भट्टने (Pooja Bhatt) गमतीने त्याला विचारले की त्याला उदिताशी लग्न करायचे आहे का? त्यावेळी त्याला अभिनेत्रीबद्दल काहीच माहिती नव्हते. (Photo: Uditaa Goswami/Instagram)
-
पूजा भट्टने उदिता गोस्वामी आणि मोहित सुरी यांची ओळख करून दिली. दोघेही एका चित्रपटाच्या ट्रायल दरम्यान भेटले. पूजाने विनोदाने उदिताबरोबर लग्नाबद्दल विचारले. (Photo: Uditaa Goswami/Instagram)
-
तेवढा वेळ दोघांसाठीही गोंधळ उडवणारा होता पण तिथूनच तर प्रेमाची सुरूवात झाली. (Photo: Uditaa Goswami/Instagram)
-
मोहित सुरी आणि उदिताच्या नात्याला २० वर्ष झाली आहेत. दोघांनी २००५ मध्ये ‘झेहर’ (Zeher, Movie) मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले होते. (Photo: Uditaa Goswami/Instagram)
-
हा मोहित सुरीचा पहिला चित्रपट होता आणि इथूनच त्यांचे प्रेम वाढत गेले. (Photo: Uditaa Goswami/Instagram)
-
मोहित आणि उदिता यांचे लग्न २०१३ मध्ये झाले. आज त्यांना देवी आणि कर्मा ही दोन मुले आहेत. (Photo: Uditaa Goswami/Instagram)
-
मोहितने ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट दिला आहे. हेही पाहा- स्मृती इराणींच्या ‘या’ मालिका माहित आहेत का? त्यांनी सीतेची भूमिका देखील साकारली आहे….

सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडवणार? कोणाच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार? वाचा तुमचे राशिभविष्य