-
लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवेने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे.
-
ऋतुजाच्या नवीन रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याला लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे व त्याची पत्नी देखील उपस्थित होती.
-
ऋतुजा बागवेने अंधेरी पूर्व, मरोळ परिसरात तिचं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. तिच्या नव्या हॉटेलचं नाव आहे ‘फूडचं पाऊल’.
-
अभिनेत्रीच्या नव्या हॉटेलची नेमप्लेट व लोगो खूपच लक्षवेधी आहे. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या नव्या हॉटेलच्या इंटिरियला मराठमोळा टच दिल्याचं पाहायला मिळत आहे.
-
रेस्टॉरंटमधील एका भिंतीवर सुंदर असं मरोळ मेट्रो स्टेशन परिसरातील चित्र रेखाटण्यात आलं आहे.
-
अभिनेत्रीच्या नव्या हॉटेलला भेट देण्यासाठी पहिल्याच दिवशी ओमप्रकाश शिंदे, प्राजक्ता माळी असे बरेच कलाकार पोहोचले होते.
-
याशिवाय तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, सिद्धार्थ बोडके, सुरुची अडारकर या कलाकारांनी सुद्धा अभिनेत्रीच्या नव्या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
-
‘फूडचं पाऊल’ या रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना व्हेज व नॉन व्हेज अशा दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
-
दरम्यान, सध्या संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातून ऋतुजावर या नव्या हॉटेलसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा बागवे इन्स्टाग्राम, last benchers stories )

Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar Arrest : पतीसाठी रोहिणी खडसेंची पोस्ट; रेव्ह पार्टी प्रकरणातील अटकेवर म्हणाल्या, “प्रत्येक गोष्टीला…”