-
नवज्योत बांदिवडेकर (Navjyot Bandiwadekar) या तरुण नवोदित दिग्दर्शकाच्या ‘घरत गणपती’ (Gharat Ganpati Marathi Movie) या चित्रपटाला २६ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले.
-
या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावे, अजिंक्य देव, निकिता दत्ता, भूषण प्रधान, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशीष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशा नामवंत कलाकारांची फौज (Marathi Actors) आहे.
-
कोकणातील निसर्गसौंदर्य यांची सांगड घालत ‘घरत गणपती’ची कथा पडद्यावर रंगली आहे.
-
कोकणातच काय अन्य कुठल्याही गावात, अगदी शहरातील घरांतही उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या कुटुंबात घडू शकेल अशी गोष्ट या चित्रपटात आहे.
-
नुकतेच ‘घरत गणपती’च्या सर्व कलाकारांनी खास सेलिब्रेशन (One Year Of Gharat Ganpati Movie Celebration) केले.
-
या सेलिब्रेशनसाठी ‘घरत गणपती’ असे लिहिलेला चॉकलेट केक (Chocolate Cake) आणला होता.
-
‘घरत गणपती’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता अजिंक्य देव आणि अभिनेत्री अश्विनी भावे ही जोडी २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
-
‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नवज्योत बांदिवडेकर/इन्स्टाग्राम)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत