-
मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) लवकरच ‘मुंबई लोकल एक अबोल प्रेमकथा’ (Mumbai Local Marathi Movie) या चित्रपटात झळकणार आहे.
-
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून उलगडणार आहे.
-
‘मुंबई लोकल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ज्ञानदाने सुंदर लूक केला होता.
-
ज्ञानदाने प्रमोशनसाठी पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान (White Long Gown Look) केला होता.
-
‘Fairytale Feels!’ असे कॅप्शन ज्ञानदाने पांढऱ्या गाऊनमधील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
ज्ञानदाच्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अभिजीत (Abhijeet) यांनी केले आहे.
-
ज्ञानदा आणि अभिनेता प्रथमेश परबचा हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित (Movie Release Date) होणार आहे.
-
ज्ञानदा व प्रथमेशबरोबरच या चित्रपटात अभिनेता मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका (Marathi Actors) आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत