-
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने पावसाच्या सरींत न्हालेलं एक मंत्रमुग्ध करणारं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
-
साडीतील पारंपरिक आणि देखण्या लुकमध्ये अश्विनी खूपच सुंदर दिसत आहे.
-
ती डोंगरावर उभी असून, तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि शांततेचा सुरेख मिलाफ दिसतो.
-
पार्श्वभूमीला हिरवळ, धुकं आणि पावसाचे थेंब असताना, तिच्या नजरेत एक वेगळाच सखोल अर्थ दडलेला जाणवतो.
-
हातात एक फूल घेतलेली अश्विनी जणू निसर्गाशी संवाद साधत असल्याचा भास निर्माण करते.
-
पारंपरिक साडी, नाजूक दागिने आणि पावसात भिजलेले केस तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळंच तेज निर्माण करतात.
-
चेहऱ्यावरील संयमी भाव, सौंदर्याचं झळकणारं तेज आणि सभोवती मनोहारी निसर्ग यांचं सुंदर मिश्रण तिच्या या फोटोंमधून दिसून येतं.
-
(सर्व फोटो सौजन्य :अश्विनी महांगडे / इंस्टाग्राम)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत