-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातली सर्वांची लाडकी प्रिया व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहे.
-
व्हिएतनाममधल्या सुंदर सफरीचे फोटो तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रिया अतिशय आनंदी दिसत आहे.
-
व्हिएतनाम देशातल्या सांस्कृतिक परंपरा, तिथल्या कला आणि खाद्यपदार्थांचा आनंद घेताना दिसते आहे.
-
इंपीरियल सिटीमध्ये तिने सफरीचा मनमुराद आनंद लुटला आहे.
-
दरम्यान प्रियाने दिलेलं फोटोकॅप्शनही सर्वांचे लक्ष वेधत आहे
-
दरम्यान, प्रियाने तिथे मराठी लोककलावंतांच्या ‘द फोक आख्यान’ या कार्यक्रमाला हजेरी लावली.
-
‘व्हिएतनामची संस्कृती पाहण्यासाठी गेले, आपली संस्कृती परिधान करून’, अशा आशयाचे कॅप्शन देताना प्रियाने त्यावर सविस्तर भाष्य केले आहे.
-
“थाट हा जुना, खेळ हा नवा @the.folkaakhyan Was waiting to write about it, निमित्त साधलं !” असं म्हणतं तिने सुरूवात केली.
-
काय अभिमान वाटला हा tshirt Vietnam मध्ये घालायला! या आख्यानाबद्दल बोलावं तितकं कमी आहे, मुळात त्यावर चर्चा करण्यापेक्षा, ते अनुभवणं जास्त महत्वाचं आहे. खरंच मराठी मातीचा सोहळा आहे. आपल्याच तिजोरीत ठेवलेल्या धनाची जाणीव करुन देणं आहे. ते धन व्यवहारात आणायला हवं. ‘अभिजात’ म्हणत म्हणत संग्रहालयात जाऊन बसायला वेळ लागणार नाही. – प्रियदर्शिनी इंदलकर
-
@harshvijaymusicals यानी अत्यंत सुंदर आणि प्रभावी बांधलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी, आपोआप थिरकायला लावणारी वाद्य, त्या २ विशेष रणरागिणी @rkrucha @me.anujaasanjay , हा नवा खेळ सादर करणारा संपूर्ण चमू, आणि जुना थाट आपल्या काळजापर्यंत पोहोचवणारा अत्यंत प्रभावशाली, प्रतिभावान सूत्रधार ईश्वर ! मानाचा मुजरा तुम्हा सर्वांना ! – प्रियदर्शिनी इंदलकर
-
या सर्वांमधून आपल्याला संत भेटतात, मावळे भेटतात, वारकरी भेटतात आणि अनेक लोककलावंत भेटतात. हा थाट आणि हे कलाकार आपल्यापर्यंत पोहोचवायचं सर्वात महत्वाचं आणि अवघड काम @ranjitgugle @bamehare यांनी केलंय, तुमचे आभार !!! – प्रियदर्शिनी इंदलकर
-
तुम्हा सर्वांवर रंगभूमी अशीच प्रसन्न होत रहावी, हीच प्रार्थना !
मराठी लोककलेला इतकी तुडुंब गर्दी आणि इतका तुफान प्रतिसाद पाहुन मन भरून पावलं ! आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला!
पुन्हा पुन्हा पहावा असा “थाट” !
The OG Show – @the.folkaakhyan – प्रियदर्शिनी इंदलकर -
अशा शब्दांत प्रियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (सर्व फोटो साभार – – प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम) हेही पाहा-भारताची पहिली महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख किती शिकली आहे?

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक