-
छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांची मांदियाळी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच ‘लपंडाव’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे.
-
नुकताच या मालिकेचा मुहूर्त सोहळा पार पडला. ‘लपंडाव’ मालिकेच्या सेटवर मुहूर्ताच्या पूजेने शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला आहे.
-
‘लपंडाव’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देव मुख्य भूमिका साकारणार आहे. तिच्या भूमिकेचं नाव असेल सखी कामत.
-
अभिनेत्री रुपाली भोसले या मालिकेत सखीच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे. तेजस्विनी कामत असं तिच्या भूमिकेचं नाव असून, तिला सगळे आदराने ‘सरकार’ म्हणतात.
-
सखी आणि तेजस्विनी या मायलेकींचं एकमेकींशी अजिबात पटत नसतं. या सगळ्यात तेजस्विनी तिच्या लेकीचं लग्न ड्रायव्हरशी ठरवते. ही भूमिका अभिनेता चेतन वडनेरे साकारत आहे.
-
‘लपंडाव’ ही नवीन मालिका १५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाईल.
-
१५ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता ही मालिका प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह’वर पाहता येईल.
-
मालिकेच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो शेअर केल्यावर चाहत्यांनी रुपाली, कृतिका आणि चेतन या तिघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी )

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”