-
बॉलीवूडची ग्लॅमरस, सुंदर, मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच माधुरी दीक्षित. तिला मनोरंजन विश्वात ‘धकधक गर्ल’ म्हणूनही ओळखलं जातं.
-
माधुरीने काही दिवसांपूर्वीच बेबी पिंक रंगाची सुंदर साडी नेसून खास फोटोशूट केलं होतं.
-
सुंदर साडी, त्यावर नेकलेस, केसात गुलाबाची फुलं या लूकमध्ये माधुरीचं सौंदर्य आणखी खुललं होतं.
-
माधुरी दीक्षितने पीच पाम ब्लूम्स टिश्यू साडी ( Peach Palm Blooms Tissue Sare ) नेसली आहे.
-
सध्या टिश्यू साड्यांचा नवीन फॅशन ट्रेंड सुरू आहे.
-
माधुरीची ही साडी तिच्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
-
माधुरीची ही साडी लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबाने तिच्या ‘हाऊस ऑफ मसाबा’ या ब्रँड अंतर्गत डिझाईन केली आहे.
-
माधुरीने नेसलेल्या या गुलाबी टिश्यू साडीची किंमत ‘हाऊस ऑफ मसाबा’च्या अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्यानुसार ३० हजार रुपये एवढी आहे.
-
दरम्यान, हीच सुंदर साडी नेसून माधुरीने ‘शेकी’ गाण्यावर खास डान्स केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम )

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…