-
Star Pravah Ganeshotsav 2025: गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो.
-
भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात.
-
बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा परिवार सज्ज आहे.
-
स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२५ या गणपती विशेष कार्यक्रमातून स्टार प्रवाहचे कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून बाप्पासमोर नतमस्तक होणार आहेत.
-
स्टार प्रवाह वाहिनीने मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य प्रत्येक कार्यक्रमातून जपलं आहे. त्यामुळे स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५ हा कार्यक्रम देखिल पुन्हा एकदा मराठी परंपरेचं दर्शन घडवेल.
-
स्टार प्रवाह परिवाराच्या दिमाखदार सादरीकरणाबरोबरच आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे यांच्या सदाबहार गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना लुटता येईल.
-
नंदेश उमप यांनी सादर केलेला लोककलेचा जागर या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवणार यात शंका नाही.
-
सध्या लहानांपासून-मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच अभंग रिपोस्ट या मराठी रॉक बँडने वेड लावलं आहे.
-
स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५ मध्ये अभंग रिपोस्ट या बॅंडची जादुई मैफल देखिल अनुभवायला मिळणार आहे.
-
या गणपती विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडलीय सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील नंदिनी म्हणजेच मृणाल दुसानिस, ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतला राया म्हणजेच विशाल निकम आणि ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतली ईश्वरी म्हणजेच शर्वरी जोग यांनी.
-
स्टार प्रवाहचा धिंगाणेबाज कलाकार अर्थातच सिद्धार्थ जाधवने देखिल कलाकारांबरोबर धिंगाणा घालत जल्लोष केला आहे.
-
तेव्हा पाहायला विसरु नका रविवार २४ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजल्यापासून स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२५.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य