-
बॉलिवूड चित्रपटांमध्ये नायक, नायिका व सहकलाकारांच्या वाट्याला अभिनयाच्या विविध छटा असलेल्या, देशातील वेगवेगळ्या भागांमधील भाषेची शैली असलेल्या भूमिका येतात. अनेकवेळा बॉलिवूडमधील अभिनेते या भूमिकांना योग्य न्याय देतात. तर, काही वेळा हे प्रयोग फसतात. बॉलीवूड कलाकार अनेकदा त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून त्यांच्या पात्रांना सांस्कृतिक, प्रादेशिक किंवा सामाजिक पार्श्वभूमीचे मूर्त रूप देतात. बऱ्याचदा प्रेक्षकांकडून त्या भूमिकांना चांगली दाद मिळते. तर, कधीकधी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येतात. (PC : Screen/TIEPL)
-
परम सुंदरी (२०२५) – जान्हवी कपूर
‘परम सुंदरी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये जान्हवी एका मल्याळी तरुणीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तिचे मल्याळी शैलीतील हिंदी संवाद चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळाले आहेत. यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. (PC : Screen/TIEPL) -
सुपर ३० (२०१९) – हृतिक रोशन
‘सुपर ३०’ चित्रपटाच्या निमित्ताने पाटना येथील गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारण्याचे आव्हान हृतिकने स्वीकारले होते. या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्याने बिहारी शैलीतील हिंदीचा वापर केला होता. त्याच्या समर्पणाचे कौतुक झाले असले तरी, अनेकांना हृतिकचा बिहारी लहेजा खोटा वाटला होता. (PC : Screen/TIEPL) -
चेन्नई एक्सप्रेस (२०१३) – दीपिका पदुकोण
चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात तमिळ तरुणी मीनाम्माची भूमिका दीपिकाने साकारली होती. दीपिकाचे संवाद समाजमाध्यमांवर ट्रोल केले गेले. मात्र, या चित्रपटाला चांगलं व्यावसायिक यश मिळालं होतं. (PC : Screen/TIEPL) -
‘रा.वन’ (२०११) – शाहरुख खान
अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘रा.वन’ या चित्रपटात शाहरुखने शेखर सुब्रह्मण्यम या तमिळ ब्राह्मण शास्त्रज्ञाची भूमिका साकारली होती. दक्षिण भारतीय शैलीतील संवादफेकीचा शाहरुखचा प्रयत्न लक्षणीय होता पण त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. काहींना तो आवडला, तर काहींना तो अतिशयोक्तीपूर्ण वाटला. (PC : Screen/TIEPL) -
लगान (२००१) आणि दंगल (२०१६) – आमिर खान
बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या आमिर खानने ‘लगान’ (२००१) आणि ‘दंगल’ (२०१६) या दोन्ही चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केलं होतं. ‘लगान’मध्ये आमिरने १९ व्या शतकातील उत्तर प्रदेशात बोलल्या अवधी/ब्रज भाषेसह हिंदीत केलेली संवादफेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्याचप्रमाणे त्याने २०१६ मधील ‘दंगल’ चित्रपटात कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या भूमिकेत अस्सल हरियाणवी बाज पकडला होता. या भूमिकेचं देखील कौतुक झालं होतं. (PC : Screen/TIEPL) -
उडता पंजाब (२०१६) – आलिया भट्ट
‘उडता पंजाब’मध्ये बिहारी स्थलांतरित कामगाराच्या भूमिकेतील आलिया प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. परंतु, तिला बिहारी शैली आत्मसात करता आली नसल्याची टीका बिहारी लोकांनी केली होती. (PC : Screen/TIEPL) -
तनू वेड्स मनू (२०११) आणि मणिकर्णिका (२०१९) – कंगना राणौत
‘तनू वेड्स मनू’मध्ये कंगनाने कानपुरिया लहेजाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यानंतर ‘मणिकर्णिका’मध्ये, राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत तिच्या शाही लहेजाने लोकांची मनं जिंकली होती. (PC : Screen/TIEPL) -
गली बॉय (२०१९) – रणवीर सिंह
रणवीरने स्वतःला पूर्णपणे धारावीचा एक महत्वाकांक्षी रॅपर मुरादमध्ये रूपांतरित केले होते. कुर्ला-धारावीसारख्या भागात बोलल्या जाणाऱ्या हिंदीत त्याने उत्तम संवादफेक केली होती.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”