-
सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडे सुद्धा दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
-
अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेले होते.
-
मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंट्सवर नाना पाटेकर यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
-
बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतल्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि नाना पाटेकर यांनी एकत्र स्नेहभोजन केलं.
-
नाना पाटेकर यांच्या घरी गणपती बाप्पासाठी सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली होती.
-
पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात नाना पाटेकर यांचं सुंदर फार्महाऊस आहे.
-
नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील फार्महाऊसला ‘नानाची वाडी’ असं देखील म्हणतात. अनेक मराठी सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या घरी भेट दिली आहे.
-
नाना पाटेकर दरवर्षी मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा करतात.
-
दरम्यान, नाना पाटेकरांच्या घरच्या गणेशोत्सवाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट )

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…