-
बॉलीवूडची आंतरराष्ट्रीय स्तरावरही छाप पाडणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा नवा लूक समोर आला असून, तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
गडद रंगाच्या शर्ट-स्टाईल टॉपसोबत गोल्डन शिमरिंग स्ट्रिप्स असलेला हेवी स्कर्ट तिने परिधान केला आहे. या आउटफिटने तिचा रॉयल आणि डॅशिंग अंदाज ठळकपणे अधोरेखित केला आहे.
-
मिनिमल पण शार्प मेकअपने दीपिकाने या संपूर्ण गेटअपला अजून उठावदार बनवले आहे. डोळ्यांवरील स्मोकी टच, नॅचरल टोन फाऊंडेशन आणि न्यूड लिपस्टिक तिच्या लूकला एलिगंट बनवतात.
-
आउटफिटसोबत मॅचिंग ब्लॅक हाय हिल्समुळे तिच्या लूकमध्ये स्टाईल आणि क्लासची उत्तम सांगड दिसून आली आहे. चालताना तिच्या पोशाखातील गोल्डन स्ट्रिप्स वाऱ्याबरोबर झुलताना तिच्या लूकला वेगळाच डौल देतात.
-
केसांचा टॉप-नॉट बन करून तिने एकदम स्लीक हेअरस्टाईल निवडली आहे. ही हेअरस्टाईल तिच्या ड्रेसला परफेक्ट सूट करत असून, तिच्या चेहऱ्यावरील आकर्षक लूक अधोरेखित करते.
-
सोन्याच्या शायनी इअरिंग्स तिच्या आउटफिटमध्ये एक वेगळा रॉयल टच आणतात. साधेपणा आणि भव्यता यांचा मेळ असलेली ही ज्वेलरी तिच्या संपूर्ण ड्रेसिंगला अजूनच खास बनवते.
-
दीपिकाने हातात घेतलेली स्टायलिश ब्लॅक बॅग तिच्या ग्लॅमरस अंदाजाला पूर्णत्व देते. संपूर्ण आउटफिटसोबत ही अॅक्सेसरी तिच्या लूकला स्मार्ट आणि आकर्षक फिनिश देते. दिपीकाच्या या फोटोंना रणवीर सिंहने “Hot Mama” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण/इन्स्टाग्राम)
(हेही पाहा: Photos: गौरी पूजनासाठी अंकिता वालावलकरचा हिरव्या खण साडीमध्ये पारंपरिक अंदाज; ब्लाऊजवरील डिझाईनने वेधले लक्ष )

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला