-
गणेशोत्सवाच्या उत्साहात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पारंपरिक मराठमोळा लूक साकारत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
सोन्याच्या झगमगत्या काठाची ऑफ-व्हाईट सिल्क साडी तिने नेसली असून, त्यावर असलेली लाल डिझाईन तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
लाल रंगाच्या जरीदार ब्लाऊजमुळे तिचा संपूर्ण पेहराव आणखी उठून दिसत असून, साडीशी केलेल्या रंगसंगतीचा मेळ उठावदार वाटतो.
-
गळ्यातील मोत्यांच्या लांब माळा आणि सोन्याच्या दागिन्यांनी तिने परंपरेला साजेशी सजावट केली आहे, जी सणाच्या निमित्ताने उत्तम भासते.
-
खास मराठमोळ्या नथीने सोनालीचा चेहरा अधिक खुलून दिसत असून, नथीची डिझाईन जरा वेगळी आहे. ही नथ तिने Houseofaddya jwellery यांच्याकडून घेतली आहे.
-
साधेपणातही उठावदार दिसणारा मेकअप आणि चेहऱ्यावरील शांत भाव तिच्या सौंदर्याला एक वेगळेच आकर्षण देतात.
-
मोकळे सोडलेले केस आणि हलकी हेअरस्टाईल तिच्या संपूर्ण पारंपरिक पोशाखाला एक नाजूक स्पर्श देतात.
-
हिरवाईच्या पार्श्वभूमीत टिपलेले फोटो तिच्या लूकला नैसर्गिक आकर्षण देतात आणि साडीच्या रंगसंगतीशी सुंदर जुळून येतात.
-
सोनालीने ज्या आत्मविश्वासाने हा पारंपरिक पोशाख साकारला आहे, त्यामुळे हा लूक गणेशोत्सवासाठी महिलांना प्रेरणा देणारा ठरतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी