-
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी जुहू समुद्रकिनाऱ्यावर दिव्यज फाऊंडेशनच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
-
या उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, लेक दिविजा फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार आणि महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सहभाग घेतला.
-
समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने स्वयंसेवक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकही उपस्थित होते. सर्वांनी मिळून गणेश विसर्जनानंतर किनाऱ्यावर साचलेला कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले.
-
या स्वच्छता मोहिमेचा उद्देश फक्त गणेशोत्सवानंतरची स्वच्छता करणे नसून वर्षभर किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करणे हा होता.
-
“चला, वर्षभर आपले समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपक्रम एक पाऊल म्हणून घेऊया” असे आवाहन दिविजा फडणवीस हिने आपल्या पोस्टमधून केले.
-
दिविजा फडणवीस हिने या उपक्रमाचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत “आमच्या सुंदर जुहू समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेत योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल @divyajfoundation चे आभार” असे कॅप्शन दिले.
-
अभिनेता अक्षय कुमारनेही किनाऱ्यावर स्वतः कचरा गोळा करून नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
-
“पुढील गणेश चतुर्थी अधिक पर्यावरणपूरक व्हावी आणि आपल्या समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य जपले जावे”, अशी अपेक्षा व्यक्त करत मोहिमेचा समारोप करण्यात आला.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिविजा फडणवीस/इन्स्टाग्राम)

“मी मुस्लीम आहे त्यामुळे…”, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याबद्दल अली गोनीची प्रतिक्रिया; म्हणाला, “कुराणमध्ये…”