-
मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) व पती अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Goshta Movie) या चित्रपटात दिसणार आहेत.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने प्रिया व उमेश तब्बल १२ वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करीत आहेत.
-
नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट आहे.
-
उद्या १२ सप्टेंबर रोजी ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रिया व उमेशने खास लूक केला होता.
-
प्रियाने पिवळ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला होता तर उमेश टी-र्शट, पॅण्ट आणि जॅकेट परिधान केले होते.
-
प्रियाने या फोटोंना ‘आजपर्यंत तुम्ही आम्हा दोघांवर खरच खूऽऽऽप प्रेम केलंत. आज १२ वर्षांनी मराठी चित्रपटात एकत्र आलो आहोत. एक Emotional, प्रेमळ आणि भावपूर्ण कथा आहे. “बिन लग्नाची गोष्ट” चित्रपट येतोय उद्यापासून. तुमचं प्रेम जे आम्ही नाट्यगृहात अनुभवतो ते इथेही मिळेल अशी आशा करतो..’ असे कॅप्शन दिले आहे.
-
हा चित्रपट लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित असून, नात्यांची नवीन व्याख्या मनोरंजनात्मकरित्या मांडतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”