-
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा नेहमीच चर्चेत असतात. हे दोघे शेवटचा ‘लाफ्टर शेफ्स २’ मध्ये दिसला होता, पण आता तिच्या नवऱ्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो रुग्णालयात दिसत आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram) -
दरम्यान, समर्थ जुरेलने त्याच्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्राम स्टोरीवर विकी जैनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विकी हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
व्हिडिओ पाहिल्यानंतर अंकिता-विक्कीचे चाहते चिंतेत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या पतीला नेमके काय झाले आहे हे अद्याप कळलेले नाही, परंतु त्याचा एक हात फ्रॅक्चर झालेला आणि त्याला पट्टी बांधलेली व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
समर्थने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो असे म्हणताना ऐकू येतोय की आपण दोन तासांनी हॉस्पिटलबाहेर भेटू. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मोठ्या भावा, लवकर बरा हो, माझा टोनी स्टार्क” (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
व्हिडिओमध्ये अंकिताही तिच्या पतीबरोबर दिसत आहे. यादरम्यान, जेव्हा समर्थने हॉस्पिटलच्या खोलीत जाताना विकीला ‘बाय’ म्हटले तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘बाय मत बोलो यार’ (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
यानंतर समर्थ म्हणतोय की आपण दोन तासांनी भेटू आणि एका मित्राच्या खांद्यावर डोके ठेवून रडण्याचे नाटक करतानाही दिसत आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी विचारले की विकी जैनला काय झाले आहे, तर काहींनी विचारले की त्याची तब्येत आता कशी आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
समर्थ जुरेल आणि अंकिता-विकी यांचे एकमेकांशी खूप चांगले संबंध आहेत. ते सर्वजण ‘बिग बॉस १७’ मध्ये एकत्र दिसले होते आणि तेव्हापासून ते मित्र आहेत. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
दरम्यान, आता विकीचा मित्र संदीप सिंहनेही एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने म्हटलं आहे, “एका भयंकर अपघातात विकीच्या हातात काचेचे अनेक तुकडे घुसले. त्याच्या हाताला तब्बल ४५ टाके पडले. गेल्या तीन दिवसांपासून तो हॉस्पिटलमध्ये आहे. इतक्या वेदनादायक अपघातानंतरही तो आम्हाला हसवतोय, जसं काही घडलंच नाही.” संदीप व चाहत्यांनी विकीने लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo: Sandeep singh/Instagram)

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”