-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी चित्रपटाच्या थीमवर आधारित पोशाख परिधान करताना दिसत आहे. यापूर्वी, मिस्टर अँड मिसेस माहीच्या प्रमोशन दरम्यान देखील तिची भरपूर चर्चा झाली होती. (janhvikapoor/Insta)
-
आता ती तिच्या ‘परम सुंदरी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि या काळात ती असे पोशाख निवडत आहे ज्यामध्ये ती खरोखरच परम सुंदरीसारखी दिसेल. (janhvikapoor/Insta)
-
परम सुंदरीच्या प्रमोशनसाठी जान्हवीचा पहिला लूक हा पिवळ्या रंगाची क्रोशिया साडी होता. या साडीवर चमेलीच्या फुलांसारखे धाग्यांचे काम होते आणि ती गुलाबी रंगाच्या ब्रालेट ब्लाऊजसोबत परिधान केली होती. (janhvikapoor/Insta)
-
गणेश पूजेच्या दिवशी जान्हवी लाल साडीत दिसली होती, त्यासोबत तिने मराठी नथ घातली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती. (janhvikapoor/Insta)
-
अलिकडेच, जान्हवीने लाल आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा घातला होता, ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. (janhvikapoor/Insta)
-
काही महिन्यांपूर्वी, जान्हवी कपूरने मसाबा गुप्ताच्या नवीन ब्राइडल कलेक्शनसाठी एक फोटोशूट देखील केले होते, ज्यामध्ये ती वधूसारखी सजलेली दिसली होती. (janhvikapoor/Insta)
-
तिच्या डोक्यावर पल्लू होता आणि तिचे चाहते या लूकने वेडे झाले होते. जान्हवीचे सौंदर्य पाहून तिचे चाहते सोशल मीडियावर भरभऱून कमेंट्स करताना पाहायला मिळतात. (janhvikapoor/Insta)
-
मसाबाने ज्या कलेक्शनसाठी फोटोशूट केले होते, त्याचे नाव सब्र, शुक्र, सुकून असे होते. (janhvikapoor/Insta)

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…