-    मराठी अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नवे फोटो शेअर केले आहेत. 
-    हे सर्व फोटो तिच्या सकाळ तर होऊ द्या या मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान काढलेले आहेत. 
-    या चित्रपटाचा काही भाग या लोकेशनवर चित्रिच करण्यात आला आहे. 
-    दरम्यान हे लोकेशन महाराष्ट्राचा मोठा शेजारी असलेल्या मध्यप्रदेश राज्यातलं आहे. 
-    या लोकेशनचं नाव आहे जहाज महल. 
-    मध्य प्रदेशमधल्या मांडू येथे असलेला जहाज महाल हा १५ व्या शतकातील एक सुंदर महाल आहे. 
-    हा महाल दोन तलावांदरम्यान बांधलेला असल्यामुळे पाण्यात तरंगणाऱ्या जहाजासारखा दिसतो. त्यामुळे त्याचे नाव जहाज महल असे पडले. 
-    या महालाचे बांधकाम १५ व्या शतकात सुलतान गियास-उद-दीन खिलजीने केले होते. 
-    मांडूमधील हा ऐतिहासिक आणि सुंदर महल पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण राहिला आहे. 
-    दरम्यान, मानसीने क्लिक केलेले सुंदर फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 
-    हा महल चित्रपटातील नाच मोरा या गाण्यातही पाहायला मिळतो आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे व मानसी नाईक प्रमुख भूमिका साकारत आहेत. 
-    कॅप्शनमधून व्यक्त केल्या भावनाअभिनेत्री म्हणून अनेक पात्रं साकारली, पण काही जागा स्वतःचं वेगळं पात्र असतात. जहाज महाल, मांडू – त्या भिंतींनी मला शब्दांशिवाय स्पर्श केलं. ‘Sakal Tar Hou Dya’च्या चित्रीकरणात हा क्षण मिळाला — जिथं मी एक पात्र नव्हते… मी होती, अगदी खरी. कॅमेर्यामागे अनेक चेहरे, पण हा माझा वेगळा प्रकाश…- मानसी नाईक 
-    (सर्व फोटो साभार- मानसी नाईक इन्स्टाग्राम) 
 हेही पाहा- हुमा कुरेशीने उरकला साखरपुडा? कोण आहे तिचा कथित बॉयफ्रेंड रचित सिंग?
 
  “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या… 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
  