-
Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्री २०२५निमित्त गायिका जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) व अभिनेत्री मिताली मयेकरचं (Mitali Mayekar) नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटी येणार आहे.
-
जुईली व मितालीच्या या नव्या गाण्याचं नाव ‘आई अंबाबाई’ (Aai Aambabai Song) असे आहे.
-
‘आवाहन गे माय..तू लवकर गोंधळाला यावं…’ असे कॅप्शन देत जुईलीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जुईली व मितालीने हिरव्या रंगाची कॉटन साडी (Green Cotton Saree Look) नेसली आहे.
-
हिरव्या साडीतील लूकवर जुईली व मितालीने पारंपरिक दागिने परिधान करत मळवट भरला आहे.
-
यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri) सुरुवात होणार आहे.
-
हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुईली जोगळेकर/इन्स्टाग्राम)

शनीच्या कृपेने कोणत्या राशीला आज लाभेल धनलाभाची संधी? वाचा मेष ते मीनचे शनिवार विशेष राशिभविष्य