-
हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत समृद्धी केळकर व अभिषेक रहाळकर यांच्या विवाह सोहळ्याचे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.
-
या मालिकेत समृद्धी कृष्णाची आणि अभिषेक दुश्यंतची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या लग्नाचा सोहळा सध्या विशेष आकर्षण ठरत आहे.
-
समृद्धीने पांढऱ्या पारंपरिक साडीत व दागिन्यांत सजून आपला देखणा अंदाज खुलवला आहे.
-
अभिषेक रहाळकरने मराठमोळ्या पांढऱ्या कुर्ता-पायजम्यात आणि फेट्यात आपला रॉयल लूक दाखवला आहे.
-
लग्नसोहळ्याच्या रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीत या दोघांचा लूक उठून दिसत आहे.
-
या विशेष भागासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
सांस्कृतिक पारंपरिक लूक, सुंदर सेट व आकर्षक अभिनयामुळे मालिकेतील हा क्षण संस्मरणीय ठरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/ इंस्टाग्राम)

सर्वपित्री अमावस्येला ग्रहांची स्थिती कोणत्या राशींसाठी ठरणार लाभदायक? वाचा मेष ते मीनचे रविवार विशेष राशिभविष्य