-
खासदार धनंजय महाडिक यांचे थोरले चिरंजीव पृथ्वीराज महाडिक २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकले. पृथ्वीराज व वैष्णवी यांचा विवाहसोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला होता.
-
वैष्णवी महाडिक सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. धाकटे दीर कृष्णराज महाडिक यांच्या कौटुंबिक व्हिडीओमध्ये सर्वांना वैष्णवी व पृथ्वीराज यांची झलक पाहायला मिळते. वैष्णवी यांचा मनमिळाऊ स्वभाव कायम सर्वांची मनं जिंकून घेतो. नेटकरी नेहमीच त्यांचं कौतुक करत असतात.
-
वैष्णवी ‘कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर’मध्ये सहभागी आहेत. यामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, या कार्यक्रमांना त्या स्वत: उपस्थित असतात.
-
वैष्णवी अलीकडेच त्यांच्या सासूबाई अन् धाकट्या जाऊबाईंसह ‘झिम्मा फुगडी’ कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
-
“गाणी, टाळ्या, हसू आणि जल्लोष” असं कॅप्शन देत वैष्णवी यांनी झिम्मा-फुगडी कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोवर एका चाहतीने कमेंट करत, “तुमचं शिक्षण किती आहे?” असा प्रश्न वैष्णवी महाडिक यांना विचारला.
-
यावर वैष्णवी यांनी, “मी पदवीपर्यंतचं शिक्षण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पूर्ण केलं आहे” असं उत्तर दिलं आहे. यावरून वैष्णवी महाडिक BBA ग्रॅज्युएट असल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
वैष्णवी व पृथ्वीराज यांच्या मुलाचं नाव अमरेंद्र महाडिक असं आहे.
-
वैष्णवी यांच्या सुंदर फोटोंवर चाहचे नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. ( सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी महाडिक इन्स्टाग्राम )

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान