-
Zee Marathi Awards 2025 Nomination Party: झी मराठी अवॉर्ड्स २०२५ सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा! याच्या नामांकन सोहळ्याचे नेहेमीप्रमाणेच भव्य आयोजन करण्यात आले होते.
-
या सोहळ्यात ‘The Timeless Gala’ ही यावर्षीची थीम होती.
-
झी मराठीच्या कलाकारांनी सुंदर लूक करत या सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या नामांकन सोहळ्याचे औचित्य आणखी खास होते, कारण यावर्षी झी मराठीने आपल्या यशस्वी प्रवासाची २६ वर्षे पूर्ण केली आहेत.
-
ही केवळ एक नामांकन पार्टी नव्हती, तर एक डबल सेलिब्रेशन होत झी मराठीचा प्रवासाचा आणि येणाऱ्या अवॉर्ड्सचा उत्साहाचं.
-
या सोहळ्यात प्रत्येक कलाकार केवळ आपल्या मालिकेसाठी नव्हे तर इतर मालिकांच्या कलाकारांनाही तितक्याच मनापासून शुभेच्छा देत होते.
-
ही स्नेहभावना आणि सन्मान झी मराठीच्या संस्कृतीचं खरे दर्शन घडवत होती.
-
नामांकनांची घोषणा पूर्ण झाल्यानंतर कलाकारांनी त्यांच्या देखण्या पेहरावात रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली.
-
टॅक्सिडो, गाऊन्स आणि आकर्षक अदा यामधून झी मराठीच्या स्क्रीनवरील परिचित चेहरे एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आले.
-
हा नामांकन सोहळा जितका उत्सवमय होता, तितकीच आता उत्कंठा लागून राहिली आहे ती मुख्य पुरस्कार सोहळ्याची.
-
‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ हा सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”