-
या वर्षात आतापर्यंत गाजलेल्या बॉलीवूड सिनेमांपैकी एक म्हणजे, ‘छावा’ सिनेमा.
-
लोकप्रिय अभिनेता विकी कौशलने यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
-
विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ अनेकांच्या पसंतीस पडला.
-
मात्र, बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने त्याला ‘छावा’ सिनेमा आवडला नसल्याचं म्हटलं आहे.
-
“मी ‘छावा’ पाहिला. विशेषतः शेवटचा अत्याचाराचा सीन, तोही माझा मित्र विनीत कुमार सिंह यात आहे म्हणून पहिला” असं अनुराग म्हणाला.
-
पुढे तो म्हणतो, “‘छावा’मध्ये ज्या पद्धतीने त्रासदायक प्रसंगांमधून भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, तो मला योग्य वाटला नाही.”
-
“दिग्दर्शकाने निवडलेली कथा मांडण्याची पद्धत मला समजली नाही, पण इतरांना ती आवडली असावी. मला हा चित्रपट भावला नाही.”
-
अनुराग कश्यपने पुढे हेही स्पष्ट केलं की, ‘छावा’ हा चित्रपट त्याला भावनिकदृष्ट्या खूपच त्रासदायक वाटला.
-
‘द लल्लनटॉप’ या कार्यक्रमात अनुराग कश्यपने ‘छावा’बद्दल आणि बॉलीवूडच्या सद्यस्थितीवर आपले मत मांडले. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान