-
हुमा कुरेशी आज बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आहे. नुकताच तिचा साखरपुडा झाला असल्याची अफवा उडाली होती. मात्र त्यार तिने अधिकृत भाष्य केलेलं नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माती फराह खान हुमा कुरेशीच्या घरी व्लागिंगसाठी गेली होती. तेव्हा हुमा कुरेशीच्या मुंबईतील जुहूमध्ये असलेल्या आलिशान बंगल्याची झलक पाहायला मिळाली.
-
हुमा कुरेशी आणि तिचा भाऊ साकिब सलीम हे मुंबईतील जुहू येथे एकाच घरात राहतात. या घराचे महिन्याचे भाडे अनेकांच्या वार्षिक वेतनापेक्षाही अधिक आहे. तसेच या बंगल्याचे सुभोभिकरणही हुमा कुरेशीनं करून घेतलं आहे.
-
नृत्य दिग्दर्शिका आणि चित्रपट निर्माती फराह खान आता व्लॉगिंग करते. अनेस सेलिब्रिटींच्या घरी जाऊन त्यांच्या किचनमध्ये जेवण बनवत एकत्र जेवणाचा आनंद आणि सोबत गप्पा अशा कार्यक्रम फराह खानकडून घेतला जातो. फराहबरोबर तिचा कुकही असतो.
-
फराह खाननं हुमा कुरेशीच्या घरी भेट देऊन तिच्या घराची झलक आपल्या व्हिडीओत दाखवली. बंगल्यातली वेटिंग रूम, मुख्य हॉल, बाहेरचा पूल आणि किचनचा व्हिडीओ फराह खानने दाखवला.
-
मुंबईत आता एवढ्या मोठ्या आकाराची घरं पाहायला मिळत नाही, असंही फराह खान सांगते.
-
मुख्य हॉलमध्ये कुटुंबाला एकत्र बसून गप्पा मारता येतील, चहा-कॉफीचा आनंद घेता येईल, अशा पद्धतीने बैठकीची रचना करण्यात आली आहे. त्यासाठी आरामदायी सोफे, खुर्च्या घेतल्या आहेत.
-
या बंगल्याची रचना आधुनिक, आलिशान अशी असली तरी त्यात एक सांस्कृतिक कलात्मकताही दिसून येते बंगल्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कलाकृती, पेंटिग्ज दिसून येतात.
-
मुख्य हॉलच्या बाहेर एक स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलची रचना अशी आहे की, इथे रिसॉर्टमध्ये बसल्यासारखा आनंद मिळतो. जुहूसारख्या समुद्रकिनाऱ्या जवळ असलेल्या परिसरात असल्यामुळे बंगल्याचे भाडेही जबरदस्त आहे.
-
३,३७० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या हुमा कुरेशीच्या बंगल्याचे महिन्याचे भाडे १० लाख रुपये इतके आहे. इंडेक्सटॅप डॉट कॉमच्या हवाल्याने फायनान्शियल एक्सप्रेसने याची माहिती दिली आहे.

“गोट्या खेळायला आलोय का?” पूरग्रस्ताच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “जीव तोडून सांगतोय तरी…”