-
अनेक लोकप्रिय कलाकारांमध्ये शशांक केतकरचे नाव घेतले जाते. ‘होणार सून मी या घरची’, ‘पाहिले न मी तुला’, ‘सुखाच्या सरींनी मन हे बावरे’, अशा काही मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये शशांकने सकारात्मक तसेच नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.
-
सध्या शशांक ‘मुरांबा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. यामध्ये त्याने अक्षय ही भूमिका साकारली आहे. रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घ काळापासून राज्य करत आहे.
-
अभिनेता त्याच्या भूमिकांमुळे अनेकदा चर्चेत असतो.
-
अभिनेता सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. त्याच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्याबद्दल तो व्यक्त होताना दिसतो. समाजातील अनेक समस्यांवर तो स्पष्ट आणि उघडपणे बोलतो.
-
आता अभिनेत्याने काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची आहे.
-
ही पोस्ट शेअर करत त्याने लिहिले, “पोस्ट थोडी लेट आहे पण ग्रेट आहे. १५ सप्टेंबरला मी ४० वर्षांचा झालो. मी खरंच सांगतो की इतका समाधानी मी याआधी कधीच नव्हतो.”
-
“४० नुसतं म्हणायला, आजूबाजूला ही सगळी माझी माणसं आहेत, त्यामुळे २० वर्षांचा झालोय असंही वाटतं नाही.”
-
पुढे अभिनेत्याने लिहिले, “उद्या अजून कितीही वय वाढलं तरी या सगळ्यांसाठी मला खंबीरपणे उभं राहायचं आहे. जे यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे शक्य होईल.”
-
दरम्यान, आगामी काळात अभिनेता कोणत्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: शशांक केतकर इन्स्टाग्राम)

IND vs PAK Live, Asia Cup 2025 Final: पाकिस्तानची दमदार सुरूवात! भारतीय गोलंदाज विकेट घेण्याच्या प्रयत्नात