-
अभिनेत्री भाग्यश्रीला १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळाली.
-
या चित्रपटात अभिनेत्रीने सुमन ही भूमिका साकारली होती.
-
चित्रपटातील गाणी, सुमन व प्रेम यांच्यातील केमिस्ट्री, सुमनचा गोड आवाज आणि चित्रपटाची कथा अशा सगळ्याच गोष्टींमुळे हा चित्रपट प्रचंड गाजला.
-
सूरज बडजात्या यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
-
या चित्रपटाचा प्रभाव आजही असल्याचे पाहायला मिळते. आजही या चित्रपटातील गाणी लोकप्रिय आहेत.
-
भाग्यश्रीच्या कामाबद्दल बोलायचे तर ‘मैंने प्यार किया’नंतर तिने लग्न केले. त्यानंतर अभिनयातून ब्रेक घेतला होता.
-
आता पुन्हा ती अभिनय क्षेत्राकडे वळली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकदा ती रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी होताना दिसते.
-
तसेच भाग्यश्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
काही वेळा भाग्यश्री सोशल मीडियावर काही डान्स व्हिडीओ शेअर करते. काही वेळा ती तिचे सुंदर फोटो शेअर करते. (सर्व फोटो सौजन्य: भाग्यश्री इन्स्टाग्राम)

तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार