-
४४ वर्षांच्या श्वेता तिवारी यांनी सांगितलं की, त्या ‘घर सांभाळणारी आई’ असूनही स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात.
-
अभिनेत्रीनं नुकतंच विनोदी कलाकार भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याशी बोलताना आपला फिटनेस रूटीन शेअर केला.
-
“मी जिमला जाते. दोन महिन्यांपूर्वीपासून पिलाटेस सुरू केलं आहे. थोडं वॉकिंग करते आणि थोडं वेट ट्रेनिंगही करते. सध्या थोडं लिमिटेड करतेय; पण पुन्हा रुटीनमध्ये परतणार आहे,” असं श्वेता म्हणाली.
-
अभिनेत्रीने कबूल केलं की, योगा आणि ध्यानाचा प्रयत्न करूनही ती अनेकदा विचारांच्या गर्दीत अडकते.
-
फिटनेस तज्ज्ञ वरुण रत्तन, संस्थापक – Evolve Fitness, यांच्या मते व्यवस्थित आखलेला रेझिस्टन्स ट्रेनिंग कार्यक्रम दीर्घकाळचा त्रास कमी करण्यास, हालचाली सुधारण्यास व शरीराच्या स्वावलंबनासाठी मदत करतो.
-
वॉकिंग ही सर्वांत सोपी आणि सुलभ व्यायाम पद्धत आहे. कोणत्याही उपकरणाशिवाय, कुठेही करता येणारी ही क्रिया दीर्घकाळ सातत्य ठेवण्यास उपयुक्त ठरते.
-
वेट ट्रेनिंगसुद्धा तितकंच महत्त्वाचं असून, वय वाढल्यावर होणाऱ्या स्नायू आणि हाडांच्या क्षतीवर नियंत्रण ठेवण्यास ते उपयुक्त ठरतं.
-
रत्तन यांच्या म्हणण्यानुसार, “वजन प्रशिक्षणामुळे शरीरात लीन मसल्स तयार होतात, हाडं मजबूत होतात आणि पडल्यामुळे होणाऱ्या दुखापतींचा धोका कमी होतो.”
-
(सूचना : ही माहिती सार्वजनिक स्रोत आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)

Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?