-
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री छाया कदम सध्या ‘मराठी सिनेमा’ घेऊन रशिया दौऱ्यावर आहेत.
-
‘कान्स’मध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता त्यांनी ‘स्नो फ्लॉवर’ (Snow Flower) या चित्रपटासह दुसऱ्या ‘रशिया इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये सहभाग घेतला आहे. त्यानिमित्ताने ‘स्नो फ्लॉवर’चे रशियातील पाच वेगवेगळ्या शहरांमध्ये स्क्रीनिंग होणार आहे.
-
फेस्टिवलसाठी रशियात पोहोचलेल्या छाया कदम यांनी सेंट पीटर्सबर्गमधील पहिल्या स्क्रीनिंगचा अनुभव सांगितला.
-
“अनोळखी शहरात आपला सिनेमा आणि आपली भाषा रुजवताना होणारा आनंद हा काही वेगळाच असतो,” असे त्या म्हणाल्या.
-
या प्रवासादरम्यानचा एक भावनिक क्षणही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितला. यंदाच्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर त्यांनी गावच्या भटजींनी प्रेमाने दिलेली साडी परिधान केली आणि नेहमीप्रमाणे आईच्या आठवणीतील नथ घालून पहिल्या शहरातील स्क्रीनिंग साजरी केली.
-
आईची मायाळू आठवण आणि पारंपरिक वेशभूषा यांमुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे त्यांनी नमूद केले.
-
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेला ‘स्नो फ्लॉवर’ हा चित्रपट भारत (कोकण) आणि रशिया या दोन भिन्न संस्कृतींमधील भावनिक नातेसंबंधांवर आधारित आहे.
-
छाया कदम यांनी गुलाबी रंगाची साडी व नाकात नथ घालून पारंपरिक लूक केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : छाया कदम/इन्स्टाग्राम)

Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?